जामनेर- गुजरात येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पाळधी ता.जामनेर येथील १० खेळाडुंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये दहाही खेळडुंनी यश संपादन करुन पाळधी नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.संपुर्ण पंचक्रोशीत खेळाडुंचे कौतुक केले जात आहे.
तालुक्यात सुरु असलेल्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना-युवासेना जामनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने खेळाडुंचा सत्कार सोहळ्यात शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पाळधी गावातील तरुण मेहनती असुन आपल्या गावाची मान उंचावण्यासाठी नेहमी धडपड करत असतो आणि यासर्व तरुणांनी हे करुन दाखविले असे शुभेच्छा पर मनोगत युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांनी व्यक्त केले तर सुत्रसंचलन दिपक माळी यांनी केले.
विजयी खेळडुंमध्ये वैभव सोनवणे याने कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल, अल्ताफ तडवी याने कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल, जितेंद्र धनगर याने कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल, वैभव पाटील याने १०० मी. हर्डल स्पर्धेत गोल्ड मेडल, करण बारी याने १००मी. धावणे स्पर्धेत गोल्ड मेडल, महेश पाटील याने ४०० मी. हर्डल्स स्पर्धेत गोल्ड मेडल, अतुल परदेशी याने ११० मी. धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल, पवन काळे याने १५०० मी. धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल, गणेश पाटील याने लांब उडी स्पर्धेत सिल्वर मेडल, भूषण परदेशी याने ५ मी. धावणे स्पर्धेत ब्राँझ मेडल पटकावले असून या सर्वांना अक्षय राजपूत यांनी विशेष सहकार्य केले आहे.
प्रसंगी युवासेनेचे तालुका प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव,पाळधी युवासेना शाखा आरोग्य अधिकारी राहुल जाधव,शिवसेना जामनेर उपशहर प्रमुख दिपक माळी,तुकाराम गोपाळ,किरण पाटील, गजानन गुरव, सागर बावस्कर, अरुण पाटील,गणेश पाटील,प्रा.ईश्वर चोरडीया हे उपस्थित होते.