मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- कौटुंबिक वादातून डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि.16 रोजी पहाटे उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की कौटुंबिक वादातून मेहुण्याने शालकाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली या घटनेत विशाल वामन ठोसरे वय – 30, भुसावळ रोड, कोर्टाजवळ, मुक्ताईनगर या तरुणाचा मृत्यू झाला.
मेहुण्यावर खुनाचा संशय…
भुसावळ रस्त्यावर विशाल ठोसरे हा युवक वास्तव्याला होता. त्याच्या बहिणीचे सुमारे चार वर्षांपूर्वी चुंचाळे यावल येथील विजय सावकारे याच्याशी विवाह झाला होता मात्र यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्यानंतर अलीकडेच सलोखा होऊन त्याची बहिण सासरी नांदत गेल्याचे समजते.
मेहुणा फरार… संशय बालवला…
गुरुवारी रात्री विजय सावकारे हा सासूरवाडीला आला व येथे त्याने गोंधळ घातला मात्र हा वाद मिटल्यानंतर विशाल ठोसरे हे आपल्या कुटुंबियांसोबत झोपले होते. शुक्रवारी पहाटे विशाल ठोसरे यांच्या आईला जाग आली असता त्यांना आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घातल्याचे दिसून आल्याने कुटुंबियांनी मोठा आक्राशे केला. याचवेळी विजय सावकारे हे घरात आढळून न आल्याने त्यांनीच हा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु…
या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.