- खाकीचा धाक संपलाय की काय?
(किशोर रायसाकडा)
पाचोरा- शहरात गुन्हेगारी एकदम जोरात असून पोलिसांचे कोणतेच अस्तित्व जाणवत नसल्याने गुन्हेगारांना जणूकाही रान मोकळे झाल्यासारखी स्थिती आहे.रात्री देखील एकावर तलवारीने हल्ला चढवीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून त्यात एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
येथे गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून पोलिस प्रशासनाने गुन्हेगारीचा बिमोड करावा व जरब निर्माण करावी; अन्यथा शहरवासीयांच्या भावनांचा उद्रेक होईल.
अल्पवयीन मुलींचे अपहरण, दोन गटात हाणामाऱ्या, हाप मर्डर, जीवे मारण्याच्या घटना, प्राणघातक हल्ले, खुलेआम तलवारी काढून दहशत पसरविणे सारख्या गंभीर घटना शहरात दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या विद्युत पंपासह स्टार्टर, केबल, शेतमाल, दुचाकी चोऱ्या यासह घरफोड्या यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. पोलिसांनी तातडीने अशा दहशत माजविणाऱ्या गावगुंडांचा व चोरट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.सध्या पाचोरा शहरातील नागरिक दहशतीखाली वावरत असल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवरायला हव्या अशी भावना जनमानसातुन व्यक्त होत आहे.