संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकालाचा कल जाहीर होत असून ममतादीदींनी एकहाती टक्कर देत थेट १९७ जागांवर आघाडी घेतली आहे.
हाती आलेल्या कला नुसार या निवडणुकीत ममतादीदी वरचढ ठरणार असं चिन्ह दिसत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी यांच्या भाजपा पक्षाला आतार्यंत ९१ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळेच येणाऱ्या निकालात तृणमूल काँग्रेस की भाजप, कोण बाजी मारणार, याचा निर्णय लवकरच होईल.
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान झाले होते.सत्ता स्थापणेसाठी १४८ ही मॅजिक फिगर आहे. कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून ममता दीदी नंदीग्राम मतदार संघातून पिछाडीवर आहेत.