जळगाव,(प्रतिनिधी)- सहजयोग ध्यान साधने ला ५१ वर्षे पूर्ती होतं असून या निमित्ताने आज २ मे रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता विनामूल्य ऑनलाईन आत्मसाक्षात्कार आणि ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी, २ मे २०२१ रोजी सायं ५ ते ६ या वेळेत प्रतिष्ठान पुणे येथून थेट प्रसारण करण्यात येत असून ‘सर्व धर्मांचे सार- प्राप्त करा आत्मसाक्षात्कार’ कार्यक्रमाची लिंक
https://youtu.be/irqtted-Fc8 यावर क्लिक करून पाहावे.
सहज योगाच्या प्रणेत्या श्रीमाताजी निर्मला देवी यांनी ५ मे १९७० रोजी ठाणे जिल्ह्याच्या सीमेजवळील नारगोल (गुजरात) येथे समुद्रकिनारी ध्यानस्थ अवस्थेत जाऊन सहस्रार चक्र भेदनाची आणि विनासायास आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची पद्धत – सहजयोग ध्यान सुरु केली. या घटनेला ५१ वर्षे पूर्ण होत आहेत .
प्रत्येक मानवाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊन जीवनात परिवर्तन यावे आणि जीवन आनंदी व्हावे हे श्री माताजींचे स्वप्न होते . त्या करिता त्या विश्वभर फिरल्या आणि सहजयोग ध्यान, भारतीय संस्कृती, कला, भारतीय जीवन पद्धती आणि दैवीय ज्ञाना चा प्रचार त्यांनी केला . या निमित्ताने सहजयोग संस्थेद्वारे रविवारी २ मे रोजी सायं ५ वा learning sahajayoga या युट्युब चॅनेल द्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. साधकांना घर बसल्या सहज ध्यान शिकविण्यासाठी दररोज सायं ५ वाजता learning sahajayoga या युट्युब चॅनेल द्वारे विनामूल्य कार्यशाळा २० जून पर्यंत घेतल्या जाणार आहे.लॉकडाऊन च्या काळात लाखो साधकांनी लाभ घेतला आहे . त्या करिता विनामूल्य टोल फ्री क्रमांक 1800 2700 800 कार्यरत आहे .
सध्याच्या काळात मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सहजयोगा ध्यान सर्वांसाठी खूपच उपयुक्त आहे.सदर कार्यक्रमासाठी विनामूल्य टोल फ्री क्रमांक 1800 2700 800 यावर रजिस्टर करावे असे आवाहन सहजयोग संस्थे द्वारे केले आहे.
सहजयोग ध्यान साधना सर्व वयोगटातील लोकांसाठी अत्यंत सरळ व सोपी असून दैनंदिन १० मिनिटे ध्यानाने प्रत्येक व्यक्ती आपल्यात परिवर्तन घडल्याचा अनुभव घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दैनंदिन कामासाठी लागणारी ऊर्जा , मानसिक सुरक्षा आणि रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी सहजयोग ध्यान धारणा अत्यंत प्रभावी आहे.
सध्याच्या अस्थिर व बिकट परिस्थितीत सहजयोग ध्यान निशुल्क ऑनलाईन कार्यक्रम शहरांत आणि संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांसाठी वरदान ठरत आहे.