स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांसाठी केवाय सी संदर्भात मोठी घोषणा करून दिलासा दिला आहे.ज्या ग्राहकांना आतापर्यंत केवायसीचे कागदपत्रे सादर करता आले नाहीत, ते ते पोस्ट किंवा ई-मेलद्वारे पूर्ण करु शकतात असं बँकेच्या वतीने ट्विट करून सांगितलं आहे.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना केवायसीसाठी शाखेत जाण्याची गरज नाही अशा सूचना दिल्या आहेत.