जळगाव, (प्रतिनिधी)- स्वस्त धान्य कार्ड धारकांना कडे १२ अंकी क्रमांक अद्यावत नसला तरी जळगाव जिल्ह्यातील या नागरिकांना कोरोनाची आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता धान्य मिळावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांनी केली आहे.
आमदार भोळे यांनी १२ अंकी क्रमांक नसलेल्या रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारींसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून जळगाव जिल्ह्यातील रेशन धारकांकडे १२ अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक नसेल तरी सुद्धा आपत्कालीन परिस्थिती विचारात घेवून धान्य वितरीत करावे अशी विनंती केली.