चाळीसगाव- येथील दत्तवाडी स्थित ईदगाह मैदानावर आज सकाळी बकरी ईद निमित्ताने ८ः३०वाजता सामुहिक नमाज पठण करण्यात आले यावेळी नमाज पठणानंतर मौलवींनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली,यावेळी ईदगाह मैदानावर चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डाॕ.विनोद कोतकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी,अनिल निकम,रमेश शिंपी,डी.वाय.एस.पी.उत्तमराव कडलग,पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड,स.वाहतुक पोलीस निरिक्षक सुरेश शिरसाठ,स.पोलीस निरिक्षक आशिष रोही यांनी मुस्लिम बांधवाना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या,यावेळी हाजी गफुर पहेलवान,अलाऊद्दीन शेख,अजिज खाटीक,सरदार शेख,असलम मिर्झा,अनिस शेख,छोटु पहेलवान,अनिस मिर्झा,शकिल खाटीक ,राजु शेख आदी उपस्थित होते.