विधानसभा पोटनिवडणूकी करिता असलेले भाजपचे bjp उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात काल देवेंद्र फडणवीसांची devendra fadanvis जाहीर सभा झाली आणि सभे दरम्यान वादळी पावसानं हजेरी लावली तरी देखील या पावसात देवेंद्र फडणवीस सभेला संबोधित करत राहीले हे फोटो आता सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत जेष्ठ नेते शरद पवार sharad pawar यांनी सातारा येथे भर पावसात प्रचार सभा गाजवली होती व उदयनराजे यांचा पराभव झाला होता. या सभेची व शरद पवार सारख्या ८० वर्षाच्या जेष्ठ नेत्यांन भर पावसातील गाजवलेल्या सभेची जोरदार चर्चा झाली होती.
आता फडणवीसांच्या सभेची चर्चा…
देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांनी पंढरपूर pandharpur विधानसभा मतदारसंघातील कासेगाव, गाडेगाव व पंढरपूर बीजेपी उमेदवारा साठी तीन सभा मेळाव्यास संबोधित केले. मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान सभेवेळी पावसाने हजेरी लावली आणि न थांबता देवेंद्र फडणवीस जनसमुदायाला संबोधित करीत राहीले.यामुळे आता शरद पवार यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांची ही सभा सोशल मीडियात चर्चेत आहे. मात्र शरद पवारांना सातारा मधून आपल्या उमेदवाराच्या बाजूनं विजय मिळवला होता. तसाच विजय देवेंद्र फडणवीस यांना आपल्या उमेदवार यांच्या बाजूनं आणण्यात किती यश येईल हे निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होईलच.
…तर ही पहिली संधी – फडणवीस
या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे.लोक म्हणतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलणार आहे का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो. पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे. असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला.
आमदार मंगेश चव्हाण यांचं ट्विट…
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूरातील पावसात झालेल्या सभे नंतर सोशल मीडियातून जोरदार कौतुक होतं असतांना चाळीसगावचे आमदार यांनी ट्विट करून म्हटलं की,
“साहेब आपण संघर्ष करा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
“ना तू थका कभी, नाही रूका कभी”
“जनसेवा के लीए , चल पडा युही”
विठूरायाच्या पंढरपुरात , माऊलीचा आशिर्वाद..
“देवेंद्रजी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है”
