आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरण बाबत ‘टीका उत्सव ‘ साजरा करण्याचं नागरिकांना आवाहन केलं असून या टीका उत्सवावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली आहे.
सौ. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,जेंव्हा रोम जळत होता तेंव्हा ‘निरो’ बासरी वाजवण्यात व्यस्त होता.जेंव्हा कोरोनामुळे देश जळत आहे तेंव्हा आमचे पंतप्रधान “उत्सव”साजरे करत आहेत. इतिहासात हे नक्कीच लिहिलं जाईल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
