कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा पासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी ‘मास्क’ योग्यपणे लावायची ही वेळ आहे…अशी टॅग लाईन वापरात आज शासनाच्या वतीने ‘मास्क’ लावणे आवश्यक असून आता ते वापरणे गरजेचं झाले आहे असा संदेश देण्यासाठी काही ग्राफिक्सच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. या ग्राफिक्सच्या माध्यमातून ‘माक्स’ योग्य रीतीने लावणे, त्याची विल्हेवाट कशी लावणे, माक्स लावण्याचे महत्व विशद कारण्यात आले आहे. माक्स लावण्याने स्वतःच्या सुरक्षेसह इतरांच्या सुरक्षा बाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.