जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात 1176 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 85989 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 11709 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 1167 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 99456 झाली. जिल्ह्यात 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1758 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
मात्र आज जिल्ह्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या अधिक असल्याने ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या घटली ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.
तसेच राज्यात आज 58993 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45391कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 534603 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.96% झाले आहे.