Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाजंत्री बँड पथक चालक, मालक, कलावंतांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्या – खासदार उन्मेशदादा पाटील

najarkaid by najarkaid
April 2, 2021
in जळगाव
0
वाजंत्री बँड पथक  चालक, मालक, कलावंतांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्या – खासदार उन्मेशदादा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगांव,(प्रतिनिधी)- राज्य सरकारने सद्यस्थितीत लॉकलाऊन सारखा निर्णय घेतल्याने काही व्यावसायिकांना सूट तर काही घटकांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाजंत्री बँड पथक सारख्या हातावर पोट घेऊन व्यवसाय करणाऱ्या चालक-मालक यांच्यावर
सध्या उपासमारीची वेळ आली असून लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगोदर लग्नांमध्ये वाजंत्रीच्या आगाऊ रक्कम ( ऍडव्हान्स सुपारी) परत देण्याची वेळ आली असून एका पथकावर 15 ते 16 लोकांचा उदरनिर्वाह होत असताना किमान कमीत कमी लोकांना वाजंत्री व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी त्यांना देखील सोशल डिस्टंसिंग शासनाचे नियम पालन करण्याचा आग्रह कायम ठेवत किमान आठ ते दहा कलाकारांना वाजवण्याची परवानगी शासनाने सहानुभूतीपूर्वक द्यावी. अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज प्रशासनाकडे केली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संस्था चाळीसगाव तालुका यांच्या वतीने अनिल साळुंके, विनायक महाजन, रवींद्र खैरनार, प्रकाश राठोड, वाल्मीक शेवरे, यांच्यासह सुमारे 40 ते 45 गावातील बँड पथक चालक-मालक गायक कलावंत यांनी आज आपल्या मागण्यांचे निवेदन खासदार उन्मेशदादा पाटील यांना त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिले.

यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रशासनाकडे या वाजंत्री चालक मालक कलावंत यांची कैफियत मांडली. किमान आठ ते दहा लोकांना सोशल डिस्टंसिंग व कायद्याच्या अनुषंगाने कशी परवानगी देता येईल.

या संदर्भात गांभीर्याने विचार करावा या वाजंत्री चालक मालक कलावंत या व्यावसायिकांनी हंगामात ऑर्डर्स सोबत घेतलेला ऍडव्हान्स परत देण्याची वेळ आलेली आहे. अनेक बँड मालक चालकांनी बँकांचे कर्ज व खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन हा व्यवसाय उभा केला आहे त्यांना कर्जाचे हप्ते भरणे अवघड झाले आहे.आपल्या कलावंतांना आपल्यासह कामगारांच्या खर्चाची तजवीज करणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे.

रितीरिवाजाप्रमाणे वाजंत्री शिवाय कुठलीही लग्न लागत नसताना फक्त कायद्याच्या बडग्यामुळे वाजंत्री व्यावसायिकांना आपली ॲडव्हान्स परत देण्याची वेळ आली आहे आपण किमान कमीत कमी आठ ते दहा कलाकारांना या संदर्भामध्ये कायद्याच्या अधीन राहून परवानगी दिल्यास त्यांच्याही रोजंदारीचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटेल याकरिता शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी विनंती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रशासनाशी बोलताना व्यक्त केली आहे.

निवेदन देण्यासाठी वडाळ्यातील जय शंकर बँड, आनंद बँड करगाव, महारुद्र बँड शेवरी,साई श्रद्धा बँड शिंदी, गजानन बँड खेडगाव,माऊली बँड वाघळी,साई झंकार बँड घोडेगाव, शंभूराजे बँड बोरखेडा, माहेश्वरी बँड चाळीसगाव, गणेश बँड वडाळा, साई मल्हार बँड लोंढे, द्वारकामाई बँड पथक हिंगोणे, साई दर्शन बँड हिंगोणे, दिनेश बँड बँड पथक बोरखेडा, विनय बँड पथक दहीवद, दिपाली बँड पातोंडा, शिव पूजा बँड पथक सेवानगर, जयश्री बँड पथक सेवानगर अशा विविध बँड पथकातील चालक-मालक, गायक कलावंत यावेळी उपस्थित होते.

बँड चालक मालक कलावंतांना अश्रू अनावर : खासदारांनी दिला धिर

याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे आपली कैफियत मांडताना अनेक बँड चालक, मालक, गायक, कलावंत यांना अश्रू अनावर झाले होते.दादा आमच्या घरात किराणा संसार कसा करावा असा मोठा प्रश्न समोर उभा आहे. आपण आमची कैफियत शासनाकडे मांडावी असे सांगताना अनेक चालक मालकांना हुंदका देणे अवघड झाले होते. या सर्वांना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी धीर देत काळजी करू नका प्रशासनाच्या अटी-शर्तीस अधीन राहून आपण तुमच्या व्यवसायासंदर्भात मार्ग काढू असा विश्वास खासदार उन्मेशदादा पाटील यांनी या बँड चालक मालक कलावंतांना दिला

Spread the love
Tags: #चाळीसगाव
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आजही हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 15 बाधितांचा मृत्यू

Next Post

काँग्रेस आमदार, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
काँग्रेस आमदार, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले

काँग्रेस आमदार, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us