जळगाव, (प्रतिनिधी)- देशातील कोरोना केसेस पैकी ६० टक्के महाराष्ट्रात असल्याने हे सरकारचं अपयश असल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश(राजुमामा )भोळे (rajumama bhole) यांनी सरकारवर जोरदार टीका करत हल्ला निशाणा साधला आहे.
आमदार राजुमामा भोळे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून म्हटलं आहे की, नुसतं कोमट पाण्याने राज्य चालवता येत नाही, राज्यासाठी जी दृष्टी लागते जी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांकडे नाही. तर नियोजनशून्य सरकार,
महावसुली सरकार असं म्हणत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत असल्याने राज्यात बेड्स, ऑक्सिजन, व्हेन्टीलिटर रुग्णांना उपलब्ध नाही, उपाय योजना नसल्याचे रुग्णांचे प्रचंड हाल होतं असल्याचे उघड झाले आहे असा आरोप भाजपा नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. राज्यातही आशिचं परिस्थिती उद्धभवली असल्याचा आरोप भाजपाने (bjp)केला असून कोरोनाच्या वाढत्या केसेस प्रकरणी भाजपानं सरकारला घेरल्याचं दिसतं.