जळगाव ,(प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत सतत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आजही 319 बाधित रूग्ण आढळून आले आहेत तर आज 80 रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे.
आज जळगाव शहरात सर्वाधिक 158 रुग्ण तर चाळीसगाव तालुक्यात 71रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हयात सध्या 1301 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.आज 319 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या 58854 इतकी झाली आहे.
आज दिवसभरात 4 बाधित रुग्णांची मृत्यू झाला. आजपर्यंत 1375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.