अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर शुक्रवारी ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर’ यशस्वीपणे उतरविला असून या ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व करणारे भारतीय वंशाच्या वैज्ञानिक स्वाती मोहन असून या एतेहासिक यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अमेरिकेच्या अंतराळ संस्था ‘नासा’ ने मंगळावर ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर ‘ उतरवून इतिहास रचला आहे. ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर’ पृथ्वीवरुन सोडल्यानंतर सात महिन्यांनंतर शुक्रवारी यशस्वीरित्या मंगळावर दाखल झाला आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन वैज्ञानिक डॉ. स्वाती मोहन यांच्या नेतृत्वात नासाने हे मोठे यश संपादन केले आहे. हे वाहन मंगळावर जीवनाची शक्यता शोधून काढेल.
डॉ. स्वाती मोहन म्हणाले, ‘मंगळावरील टचडाउन निश्चित झाले आहे. आता जीवनाची चिन्हे शोधणे सुरू करण्यास तयार आहे.