j
भुसावळ;- संपूर्ण महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरण क्षेत्रात ५१ मिमी पाऊस झाला असून मुसळधार पावसाने धरणाचे 41दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत.धरणातून ९१५४९ क्युसेस पाण्याचा तापी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे.
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्हाधिकार्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या टेक्सा, चिखलदरा व बऱ्हाणपूर येथे सुरु असलेल्या पावसामुळे दि. 8 ऑगष्ट गुरुवार रोजी सकाळी 8 हतनुर धरणाचे२४ दरवाजे उघडण्यात आले आहे.गेल्या दोन दिवसां पासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हतनूर धरणाच्या जलसाठयात वाढ झाल्याने आज सकाळी ११ वाजता ३० दरवाजे पूर्णतः उघडून पाण्याचा प्रतिसेकंद तर प्रतिसेकंद २५९२ क्युमेक्स, (९१५४९ क्युसेस )पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
8 ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजता धरणाचे २४ दरवाजे पूर्णतः उघडून पाण्याचा प्रतिसेकंद २३१२ क्युमेक्स व ८१६५९ क्युसेसने विसर्ग करण्यात येत होता. तर तीन तासात सकाळी ११ वाजता पाण्याची पातळी २०९.९०० मि. असून ५१.०० मि मि पावसाची नोंद झाली आहे तर प्रतिसेकंद २५९२ क्युमेक्स, (९१५४९ क्युसेस )पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे .
सकाळी ८ वाजता ४७.५० मि. मि पावसाची नोंद झाली होती धरणात विसर्गा नंतरही २१०.०८० मीटर जलपातळी होती . धरणात पाण्याची आवक वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान उजव्या तट कालव्यातूनही पूर्नभरणासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सलग होत असलेल्या विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या चिखलदरा, बऱ्हाणपूर, टेक्सा, ऐरडी, देडतलाई आदी ठिकाणी पून्हा पाऊस वाढल्यास धरणातील जलसाठा वाढून विसर्गही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
दरम्यान हवामान खात्याने जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात दिनांक आठ व नऊ ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सततच्या मुसळधार पावसामुळे धरणाचे ३० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून धरणातून ९१५४९ क्युसेस पाण्याचा तापी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे. पाऊस असाच राहिल्यास धरणाचे अजून दरवाजे उघडले जातील असे प्रशासनाने सांगितले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्हाधिकार्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.