जामनेर, (प्रतिनिधी) – उद्या दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून रॅली /प्रभात फेरी रद्द करण्यात आली असल्याचे संयोजक भगवान शिंदे यांनी कळविले आहे.
यंदा कोरोना महामारी मुळे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय नियमानुसार प्रभातफेरी/रॅली न काढता सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत साध्यापद्धतीने अभिवादन करण्यात येणार आहे.
तरी सर्व शिव प्रेमींनी सकाळी ठीक 10 वाजता नगर पालिका जवळ राजमाता चौक येथे अभिवादन साठी उपस्थित राहावे.
तसेच मास्क,सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे.