जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे खुद्द खडसे यांनी नुकतचं आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कळविले आहे.
खडसे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो.