जळगाव – पिलखोड-चाळीसगाव येथील प्रसिध्द हस्तरेखा तज्ञ डॉ. जितेंद्र बापुराव चव्हाण यांना शिर्डी येथे सरपंच सेवासंघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने अध्यात्मिक क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संरपच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयाेजीत “मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान साेहळा २०२० ,महान संत साईबाबांची पावन भुमी शिर्डी येथे दि २२ जानेवारी राेजी आयोजित करण्यात आला होता.
शिर्डी लाेकसभा मतदार संघाचे खासदार मा.सदाशिवराव लाेखंडे,समाज प्रबाेधनकार मा.निवॄत्ती महाराज देशमुख ईदुंरीकर,माननिय राज्यमंत्री नगरविकास महाराष्ट्र राज्य प्राजक्त तनपुरे,संरपच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे साहेब,संरपच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे,सघांचे राज्य पदाधिकारी यांच्या हस्ते आध्यत्मिक गुरू राज्य स्तरीय पुरस्काराने डॉ.चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.डॉ. जितेंद्र चव्हाण गेल्या पस्तिस वर्षा पासुन ह्या क्षेत्रात आहै.नोव्हेंबर मध्ये मुंबई येथे पंचतारांकित हॉटेल पनेसुला अंधेरी या ठिकाणी चित्रपट क्षेत्रातील अति सन्मानाचा समजला जाणारा दादा साहेब फाळके कोरोना योद्धा हा पुरस्कार दिग्गज मान्यवर यांच्या हस्ते मिळाला.सोबत ते रुख्मिनी चॅरिटेबल ट्रस्ट व आस्था अनघादि फौंउडेशन या सामाजिक संस्थान मार्फत ते सामाजिक कार्य देखिल करत असतात.या सन्मानाने समाजातील विविध स्तरातून डॉ.जितेंद्र चव्हाण यांच्यावर सर्व स्थरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.