पाचोरा – कर्जत -जामखेड मतदार संघाचे आमदार व युवा नेतृत्व रोहित पवार हे रविवार ता 24 रोजी विविध कार्यक्रमा निमित्ताने पाचोरा येथे आले असता त्यांचे व्यक्तिमत्व पाहून व विचार ऐकून त्यांनी पाचोरा वासियांची अक्षरशः मने जिंकली. त्यांच्याशी झालेल्या संवादाने तरूणाई प्रचंड भारावली.
आमदार रोहित पवार यांचे हस्ते कजगाव येथे विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन तसेच रुग्णवाहिका लोकार्पण झाल्यानंतर त्यांचे पाचोरा येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत, फटाक्यांच्या आतीषबाजीत आगमन झाले. डॉ भूषण मगर व डॉ सागर गरुड यांच्या विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करत रूग्णांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर भडगाव रोडवरील महालपुरे मंगल कार्यालयात डाॅ भूषण मगर फाउंडेशनच्या वतीने कौशल्य विकासावर आधारित युवा संवाद कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीचेचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील, संजय गरुड, अभिषेक देशमुख, ॲड विश्वास भोसले, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे ,डॉ भूषण मगर ,डॉ सागर गरुड आदी उपस्थित होते .
याप्रसंगी कोरोना काळात आपले अद्ययावत हॉस्पिटल शासनास देऊन कोरोना योद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ भूषण मगर यांचा एबीपी माझाच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमदार पवार यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधून आपला देश खऱ्या अर्थाने युवा आहे. राज्य व देशाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने युवकांवर असल्याने त्यांनी ती जबाबदारीने पार पाडण्यासाठी सजग राहिले पाहिजे. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन व युवकांची ताकद यांचा सुयोग्य संगम साधल्या शिवाय विकास होऊच शकत नाही. नवे व चांगले रुजवायचे असेल तर त्यासाठी युवकांची ताकदच महत्त्वाची असते . परंतु अलीकडच्या काळात युवकांचा अयोग्य कामांसाठी वापर करण्याची मनोवृत्ती वाढत आहे व युवकही त्याला बळी पडत आहेत. ही बाब अत्यंत घातक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर युवक बराच वेळ असतात परंतु ते त्याचा कसा वापर करतात ते सांगणे कठीण आहे. इंटरनेटचा वापर नवीन काही मिळते का याच्यासाठी करण्याऐवजी गेम खेळण्यासाठी व विघातक बाबींसाठी होणे तरुणाईसाठी घातक असल्याचे सांगून तरुणांनी शिक्षण घ्यावे, आपली ताकद व आपले ज्ञान कुटुंब ,समाज ,राष्ट्र व देश विकासासाठी वापरण्याची मनोवृत्ती जोपासावी. येत्या दहा वर्षात नोकरी हा विषयच राहणार नाही. त्यामुळे आपल्या अंगी असलेली कौशल्ये विकसित करून त्याआधारे युवकांनी जगण्यासाठी सिद्ध व्हावे. नवीन आव्हाने पेलावी, आपला कोणी चुकीच्या कामांसाठी वापर करणार नाही याबाबत सतत जागरूक रहावे, विचार आणि विकास यात योग्य ती सांगड घालावी, कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, आपली ताकद विधायक कार्यासाठी वापरावी असा सल्ला दिला.
युवा संवाद कार्यक्रमात रामकृष्ण पाटील ,सचिन कोकाटे ,अर्जुन पाटील, डॉ प्रशांत पाटील, पंकज पाटील, शुभम खैरनार, दत्ता साबळे या युवकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक व समाधानकारक उत्तरे देऊन त्यांनी तरुणाईच्या मनात अढळ स्थान निर्माण केले .
युवा संवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ भूषण मगर यांनी केले . शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ सागर गरुड यांनी आभार मानले .
त्यानंतर पीटीसी संस्थेच्या गो से हायस्कूलमध्ये स्व. सागर कासार प्रवेशद्वाराचे उद्घाटन व शाळेच्या आवारात जिजाबाई पाटील रंगमंचाचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते झाले ‘याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन , अॅड रवींद्र पाटील,संजय गरूड, भुषण पाटील, माजी आमदार तथा पीटीसी संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचीव अॅड महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख ,विनय जकातदार, वासुदेव महाजन, सतीश चौधरी, नाना देवरे ,शांताराम पाटील, नितीन तावडे, अभिमन्यू पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, भूषण वाघ, भागवत महालपुरे ,शालिक मालकर, विकास पाटील भागचंद राका, अजहरर खान ,अर्जुंनदास पंजाबी, योगेश पाटील ,जगदीश सोनार, हारुण देशमुख, प्रल्हाद पाटील,संजय सुर्यवंशी, सुरज वाघ, गौरव वाघ ,आकाश वाघ ,प्राचार्य डॉ बी एन पाटील, प्राचार्य एन एन गायकवाड, उपप्राचार्य प्रा डॉ वासुदेव वले,प्रा शरद पाटील ,मुख्याध्यापक सुधीर पाटील ,अभिमन्यू पाटील, रणजित पाटील, जिजाबाई पाटील, विश्वास साळुंखे ,एल एस शिंपी, प्रमिला वाघ ,आर एल पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी खलील देशमुख यांनी पीटीसी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक गुणवत्तेसह विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. आमदार रोहित पवार यांनी यावेळी आपल्या मनोगतातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षण संस्थांच्या उन्नतीसाठी संस्थाचालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगून संस्थेच्या पदाधिकाऱ्यां संदर्भात गौरवोद्गार काढले. यावेळी दानशूर कासार व पाटील कुटुंबियांचा आमदार पवार यांचे हस्ते गुणगौरव करण्यात आला. खलील देशमुख यांनी प्रास्ताविक केले. महेश कौण्डिन्य व अजय अहिरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. एकूणच या सर्व कार्यक्रम प्रसंगी आमदार रोहित पवार यांचे सालस व साधे व्यक्तिमत्व, सामाजिक कार्याची असलेली आवड व तळमळ,
सामाजीक संवेदना व काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द,दुरद्दष्ट्री व कल्पकता या गुणांमुळे त्यांनी पाचोरा वाशीयांची मने जिंकली. पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून ते शेंदुर्णी व जळगाव येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले.