पाचोरा – तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या विकास कामांचे लोकापर्ण, मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन, शिवसेना – युवासेना शाखा फलक अनावरण सामनेर, लासगाव,बांबरुड राणीचे,नांद्रा,कुरंगी, माहिजी, वरसाडे,दहिगाव,डोकलखेडा, आसनखेडा बु / खु , हडसन, पहान, मोहाडी, दुसखेडा, परधाडे, वडगाव टेक, वडगाव बु /खु , वडगाव खु.प्र.पा आदी गावांमध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाला.
आमदार आपल्या गावी चा जन आशीर्वाद अभियानानंतर्गत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आमदारफंड, मूलभूत २५१५, अर्थसंकल्प, डी.पी.डी.सी, जलयुक्त शिवारअभियान, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना, तीर्थ क्षेत्र विकास योजना, तांडा वस्ती सुधार योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, वीज वितरण कंपनी, दलितवस्ती सुधार योजना,अल्पसंख्याक फ़ंड,व्यायाम शाळा विकास अनुदान, आदी विविध फंडातून निधी उपलब्ध करून गेल्या ४ वर्षातील प्रत्येक गावामध्ये केलेल्या विकासकामांची गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि. का. सो. चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, जेष्ठ शिवसैनिक, शेतकरी बांधव, युवावर्ग जि.प. गटातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधीना यांच्या समवेत झालेल्या बैठकीत माहिती दिली. भविष्यात आपल्या गावासाठी काय केले पाहिजे अशी विचारणा करून ग्रामस्थांच्या अडी – अडचणी समस्या, प्रश्न समजून घेतले. व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनधवनीवरून संपर्क साधून समस्यांचे निराकारण करण्यात आले.
यावेळी आप्पासाहेबांनी संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार योजनेअंतर्गत विधवा, परिकवता घटस्फोटित, अपंग, दुर्धर आजारी रुग्ण आदींना लाभ मिळवून दिल्याचे नमूद केले. तसेच महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या शासनाने मंजूर केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनाची माहित देऊन एकही कर्जदार वंचित राहणार नाही असे सांगितले पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधावास रु. ६०००/- मिळणार असल्याचे नमूद केले. जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या साठवण बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले.
८०% समाजसेवेच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर, ऍम्ब्युलन्स सेवा, पाणी आडवा पाणी जिरवा साठी महाकाय जे.सी बी. यंत्राची सेवा अशा अनेक समाजसेवेची जनहिताची कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी अजय जैस्वाल यांनी प्रस्तावित केले, बैठकीस दिनकर देवरे, गणेश पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शरद पाटील तालुका प्रमुख, पदमसिंग पाटील जि.प.सदस्य, राजू भैय्या, रवींद्र पोपट पाटील,पंढरीनाथ पाटील, साहेबराव पाटील, कैलास पाटील, जितेंद्र पाटील युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख, डि.के.पाटील, युवराज काळे, सुभाष तावडे, अनिल सोनवणे, व प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्यगन , चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
सोबत फोटो मेल केलेले आहेत.