जळगाव, (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे यांचे निलंबन त्वरित मागे घेण्यात येऊन त्यांची पुनर्स्थापना करण्यात यावी या आशयाचे निवेदन जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले. यावेळी कास्ट्राईब महासंघाचे शिष्टमंडळ बापू साळुंखे, संदीप हीरोडे, धनगर साहेब, साधना बाविस्कर, प्रभावती बावस्कर, नितीन सोनवणे उपस्थित होते.















