जळगाव, (प्रतिनिधी)- धुळे-नंदुरबार जिल्ह्यात विधानपरिषद निवडणुकीकरिता भाजपचे 198 व महाविकासआघाडीची 213 मते असतांना भाजपाने 332 मते मिळवत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवलेला आहे.असं ट्विट करुन भाजपा नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
तर धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ.श्री.अमरीशभाई पटेल यांचे गिरीश महाजन यांनी ट्विट करुन अभिनंदन देखील केले आहे.

















