जळगाव, (प्रतिनिधी) – भाजपा खासदार रक्षाताई खडसे यांना पक्षानं नंदुरबार जिल्हा भाजपाची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविल्यानंतर आज त्यांनी नंदुरबार येथे आढावा बैठक घेतली.यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी नंदुरबार जिल्हा भाजप कार्यालय येथे भेट दिली याप्रसंगी खा.डॉ.हिनाताई गावित, खा.डॉ.भारतीताई पवार, जिल्हाध्यक्ष विजयदादा चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.
रक्षाताई खडसे यांचे सासरे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर रक्षाताई या देखील पक्षांतर करतील अशी चर्चा होती मात्र त्यावेळीच त्यांनी मी भाजपात राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं व पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारून काम करणार असल्याचं सांगितलं होतं.
भाजपनं नुकतेच रक्षाताई खडसे यांना नंदुरबार प्रभारी पदाची जबादारी दिली असून त्या नुसार रक्षाताई खडसे या कामाला देखील लागल्या असल्याचं दिसत आहे.