जळगाव – राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे कुलदीप संजय देशमुख (शिंदी, ता.चाळीसगाव) यांना कु्षीभूषण पुरस्कार 2020-21 जाहीर झाला आहे.
कुलदीप देशमुख यांनी सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले असून याबाबत ते जनजागु्ती करीत आहेत. नागरिकांना विषमुक्त फळे, भाजीपाला मिळावा, म्हणून ते प्रयत्नशिल अाहेत. सेंद्रीय पध्दतीने घेतलेले उत्पादन ते ग्राहकांपर्यंत घरपोच पोहचवितात. तसेच ते बळीराजा सेंद्रीय शेती फार्मवर शेळीपालन, गावराण कुक्कुटपालन, दुग्ध, मत्स व्यवसाय, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रीय खते व औषध तयार करण्यासंदर्भात आणि विविध शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत. देशमुख यांनी अनेक पिकांचे विक्रमी उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी संदेश दिला आहे. या उल्लेखन कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते लवकरच होईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी कळविले आहे.