जळगाव (प्रतिनिधी) – शहरालगत लगत असलेल्या सावखेडा,वैजनाथ,निमखेडी व इतर नजीकच्या गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरु असून ऐन दिवाळीतही गिरणा नदीपात्राचे दिवाळं काढून दिवाळी साजरी करतांना दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यात नेहमीच वाळू हा विषय ‘हॉट’ ठरत आहे. वाळू चोरी करणे काही नवीन विषय राहिलेला नाही. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू वाहतूक करणारे वाहन भरदिवसा, रात्री फिरकत असतात याचा अर्थ असा नाही की वाळूचोरी करणारे प्रशासनाला घाबरत नाही मात्र विशेष महसूल बुडवणाऱ्या या वाळू चोरी करणाऱ्यांना काही महसुलातील महाभागांची साथ असते हे सर्वश्रुत आहे.
कारवाई तेवढ्या पुरतीच…
वाळू चोरी होत असतांना कुठं तरी कारवाई दिसावी म्हणून एखादी कारवाई करून कारवाई केल्याचा आव देखील आणला जातो प्रत्यक्षात मात्र ”तेरी भी चूप, मेरी चूप ‘अशीच परिस्थिती असते. पर्यावरण प्रेमींकडून
एवढीच अपेक्षा….
आज गिरणा नदी पात्रांमध्ये सर्वेक्षण केल्यास एक भयावह चित्र समोर येईल, त्यात कारवाईचा बडगा उचलला तर भले भले वाहून जातील… आतापर्यंत जे झालं ते झालं, आता तरी गिरणा नदीपात्राचे लचके तोडणे बंद झाले पाहिजे, सणासुदीच्या दिवाळीच्या काळात तरी ‘गिरनाईचं दिवाळं’ काढून दिवाळी साजरी व्हायला नको.