औरंगाबाद, – विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून दिली आहे. दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं आहे.















