जळगाव, (प्रतिनिधी) – माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नावानं बनावट ट्विटर अकाउंट उघडले असल्याबाबतची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करून दिली असून @EknathGKhadse अधिकृत अकाउंट असल्याचे सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, खोडसाळपणा… कुणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने @KhadseSpeaks हे ट्विटर अकाउंट सुरु केले आहे, जे अनधिकृत आहे. याच्या संदर्भात रीतसर ट्विटरकडे रिपोर्ट आणि तक्रार दाखल केली आहे.
माझे अधिकृत अकाउंट @EknathGKhadse हे असून त्याला २ लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.