अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणूकीकडे अख्या जगाचे लक्ष असतांना सात दिवस आधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या सातारा येथील पावसाच्या सभेतील भाषणाचा संदर्भ देत अमेरिका राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवार ‘जो बायडन’ यांचा भर पावसात सभेला संबोधित करतांनाचा फोटो आपल्या ट्विट हॅण्डल शेअर करून ‘जो बायडन’यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता आणि तो खरा देखील ठरला आहे.
“आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं की, जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तुसभरही विचलित होतं नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल…
२०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे.” असं ट्विट करून जो बायडन यांच्या विजयाचा अंदाज वर्तविला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेत जोरदार पाऊस पडत असतांना आपलं भाषण न थांबता सुरु ठेवलं होतं… त्यांचा तो उत्साह संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं निवडणुकांचं चित्र पूर्ण पालटलं हेही तितकंच खरं.
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात लढतिकडे संपूर्ण जगाचे लक्ष होतं सुरुवातीला ट्रम्प आघाडीवर होते आता बायडन यांनी आघाडी घेत विजय मिळविला आहे.
इलेक्टोरल मतदानामध्ये डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडन यांनी ट्रम्प यांना मागे टाकत बहुमतासाठी लागणार इलेक्टोरल २७० मतांचा जादुई आकडा पार केला. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिकचे उमेदवार जो बायडन यांच्यात मोठी चुरस झाली त्यात बायडन यांनी विजय मिळविला
















