शिरपूर – अहंपणामुळेच भाजप पक्षातून कार्यकर्ते बाहेर पडत असून नाथाभाऊ सोबत कोण आहे, कोण नाही याचे परिणाम पुढील कालखंडात दिसून येतील असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिरपूर येथील कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना सांगितलं.
दोन दिवसापूर्वी भाजपा नेते गिरीश महाजन यांनी खडसेंसोबत कोणीही जाणार नाही असे वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचा समाचार घेत खडसेंनी महाजनांना जोरदार टोला लगावला. आमच्या पक्षातून कितीही जण बाहेर गेले तरी आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. भाजप पक्ष यामुळे संपणार नाही. त्यांची ज्याप्रकारची भाषा आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहे. माझ्या संपर्कात अनेक लहान मोठे कार्यकर्ते, नेते आहेत त्यामुळे येणाऱ्या कालखंडात ते दिसूनच येईल असंही खडसे यावेळी म्हणाले.
शिरपूर शहरातील विमलनगर येथील एका लॉन्स मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.