आपल्याला ‘क्वीज शो’ कडून ₹२५००००० असे बक्षीस जाहीर झाले आहे किंवा आपल्या मोबाईल नंबरचा लकी ड्रा मध्ये निवड होऊन लाखोंची बक्षीस तुम्हाला लागल्याचं भासवणारे मॅसेज कडे दुर्लक्ष करा अन्यथा तुम्हाच्या खिशाला मोठा भुर्दंड बसू शकतो आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते म्हणून आधीच सावध होऊन अशा ‘आमिष’ देणाऱ्या मॅसेजेस कडे पूर्णतः दुर्लक्ष करा.
अशाच होणाऱ्या फसवणुकी बाबत पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनी ट्विट करून अवाहन केलं आहे की, कोणतेही मंत्रालय किंवा शासकीय कार्यालय तृतीय पक्षाच्या समन्वयाने बक्षीस जारी करत नाही.
आपल्याला ‘क्विज शो’ कडून ₹२५००००० असे बक्षीस जाहीर झाले आहे किंवा अशा आशयाचा संदेश प्राप्त झाल्यास ते मिळवण्याकरिता पैसे पाठवू नका. याविरुद्ध तक्रार नोंदवा.