संत सेवालाल महाराजांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांचे आज दुःखद निधन झाले. लोकशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे महानकार्य त्यांनी घडविले आहे. तपस्वी रामराव बापू महाराजांवर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या अनुयायांची संख्या मोठया प्रमाणात आहे.