जळगाव,(प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्ष ‘व्यक्तिसापेक्ष’ नसून विचारधारेवर चालणारा पक्ष आहे त्यामुळे कुणी पक्षातून गेल्याने काहीही परिणाम होणार नाही. एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काही खिंडार पडणार नसून आमचे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी पक्षासोबत आहेत. त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचा दावा आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला आहे. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
खा.रक्षा खडसे या आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीला गैरहजर असल्याचे पत्रकारांनी विचारलं असता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं की खासदार खडसे या दिल्ली येथे मिटिंग ला गेल्या आहेत तिथून आल्यावर पक्षाच्या संघटनात्मक कामाला सक्रिय होतील.