गौरवकुमार पाटील / अमळनेर –अमळनेर येथील समर्थनगरातील पद्मावती अपार्टमेंटमधील ३६ वर्षीय महिलेची जैतपिर येथे तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी घडली.
सर्वत्र दसरा सण सायंकाळी साजरा होत असतानाच अमळनेर येथील समर्थनगर मधील पद्मावती अपार्टमेंट मधील दीपाली गुणवंत पवार वय ३६ ही महिला एमएच- १९ बीएच- ६७६९ क्रमांकाची दुचाकी घेऊन आली व त्या महिलेने होंडा स्कुटी घेऊन पाडळसरे येथून जवळच असलेल्या जैतपिर शिवारातील ७/८ फूट पाण्याने तुडुंब भरलेला तलाव गाठून तेथेच दुचाकी उभी करून दिनांक २५ रोजी सायंकाळच्या ५ :३० ते ६ वाजता तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गावातील शेतकरी धनराज बागुल यांनी पाहिले त्यांनी लागलीच पोलीस पाटील गोविंदा पाटील यांना भ्रमणध्वनी वरून वरील हकीकत सांगितली, पोलीस पटलांणी पोलिसांना कळविताच घटनास्थळी हवालदार भास्कर चव्हाण ,पोलीस नाईक सुनील तेली,सुनील अगोने हे पोहचले त्यांनी पोलीस पाटील यांच्या मदतीने गावातील पट्टीचे पोहणारे संतोष कोळी, गंगाराम कोळी ,महेंद्र पाटील यांच्या मदतीने तलावात शोधून १०८ अँम्बुलन्सने महिलेला ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले, होंडा स्कुटी वरील नंबर मोबाईल अँपमध्ये टाकल्यावर समर्थ नगर ,पद्मावती अपार्टमेंट अमळनेर असा पत्ता आल्याने त्याबाबत व्हाट्सप ग्रुपवर टाकल्याने विवेक पाटील यांनी मृत महिलेची ओळख सांगितली, सदर महिलेचा घटस्फोट झाल्यापासून दीपाली पवार ही नैराश्याने राहत होती त्यातूनच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली याबाबत जैतपीर येथील पोलीस पाटील गोविंदा पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत.