जळगाव, (प्रतिनिधी) ‘विजयादशमी’ च्या शुभेच्छा देत ”सीमोल्लंघन… विकासासाठी…रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी… अस्मिता जपण्यासाठी”… असं ट्विट माजी मंत्रि एकनाथ खडसे यांनी आज केलंय.
एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश झाल्यानंतर ‘सीमोल्लंघन’ कशासाठी केल्याचे या ट्विट च्या माध्यमातून स्पष्ट केलं असून चला… सोबत येऊन एक नवे पर्व घडवू या… असं अवाहन करत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला विजयदशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
एकनाथ खडसेंच्या या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने पावलं उचलली जाणार असून रखडलेल्या प्रकल्पांना पूर्णत्वासाठी खडसेंनी तयारी केलेली दिसत आहे.येणाऱ्या काळात खडसे भाजपा विरुद्धची बाजी कशी जिंकतात हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.