कर्जत/लोभेवाडी/(मोतीराम पादिर) – जैतू सदू पारधी (मा.अध्यक्ष आदिवासी ठाकूर समाज संघटना,कर्जत) यांनी तालुक्यातील अनेक आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे,अल्पभूधारक शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने झालेल्या अतोनात नुकसानीचे अजूनही पंचनामे केलेले नाहीत, कोरोनामुळे मेटाकुडीला आलेल्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांवर हया परतीच्या पावसामुळे मोठे संकट उभे झाले आहे.त्यामुळे आमचा आदिवासी भागातील शेतकरी आपल्या झालेल्या भातपिक,व पूरक पिकाच्या नुकसान भरभाई पंचनाम्यासाठी अधिकारी वर्गाच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आहे.त्या संदर्भात मा.प्रांताधिकारी मॅडम,मा.तहसिलदार साहेब,यांना निवेदन देऊन निदर्शनात आणून दिले आहे,कि कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील नुकसान ग्रस्त सर्वच शेतकऱ्यांचे संबंधित काळात पंचनामे न केल्यास शेतकऱ्यांसाठी समाजातील महत्त्वाचे मान्यवर आमरण उपोषणास बसणार असल्याचे 22 रोजी निवेदन देऊन प्रशासनास कळविले आहे
निवेदन देण्यासाठी श्री.जैतू पारधी,श्री.मंगळ केवारी,श्री.गजानन भला,श्री.भरत शिद,श्री.हिंदोळे सर,श्री.गणेश पारधी,श्री.ढोले सर,श्री.प्रकाश केवारी*मोतीराम पादिर