गौरवकुमार पाटील / अमळनेर – तालुक्यातील तांदळी येथील प्रेम प्रकरणातून विवाह झालेल्या विवाहितेला पती सह घरच्यांनी संगनमताने जबर मारहाण करून डिझेल टाकून जाळून टाकण्याचा प्रकार काल दिनांक २२ रोजी घडल्याने पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिल्याने पती सह सासरच्या पांच जणांविरुद्ध विविध १० कलमांनव्ये सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल झाला असून तांदळी गावी घटनास्थळी तपासी अधिकारी राहुल फुला व डीवायएसपी राकेश जाधव यांनी धाव घेऊन पाहणी केली व पंचा समक्ष पंचनामा केला मात्र रात्री उशिरा वृत्तलिहे पर्यंत घटक करण्यात आली नव्हती
याबाबत माहिती अशी की तांदळी येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय विवाहितेचा प्रेम संबंधातून पाच महिन्या पूर्वीच प्रेम विवाह होऊन पीडित तरुणी सासारकडे एकत्र कुटुंबात राहू लागली मात्र हे जेठाणी व सासरच्यांना खटकत होते त्यातून वारंवार टोचून बोलणे ,विनाकारण मानसिक व शारीरिक छळ केला जात होता त्यातूनच काल दिनांक २१चे रात्री जेठाणीने पतीचे मदतीने भांडण झाले त्यामुळे पुन्हा सकाळी वाद होऊन जेठाणीने अश्लील बोलून अपमान करीत शिवीगाळ व करीत असताना पतीनेही त्यात सहभाग घेऊन अश्लील व लाजस्पद शब्द बोलून दंडुक्याने मारहाण करीत होते तेव्हा सासूने ही आईवडील यांना व पीडितेला शिवीगाळ केली सासू व जेठाणीने धरून ठेवत पतीने लाथाबुक्याने मारहाण करून पतीने ट्रॅक्टर साठी आणलेले डिझेल अंगावर ओतून जाळून मारण्याचा उद्देशाने फ्रिजवरील आगपेटी आणून पुतण्याला फ़ोटो काढावयास सांगितले त्यातून सुटका करून महिलेने ओट्यावर पळ काढला त्यादरम्यान १० ते ११ वाजेला पतीचे गोवर्धन येथील व गावातील असे दोन मित्रांच्या मदतीने वडिलांचे घरी केस ओढून अपमानास्पद वागणूक देऊन आई वडिलांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ केली तेथून गावातील ओळखीचा व्यक्तीने कळमसरे पर्यंत सोडले व जीव मुठीत धरून पोलीस स्टेशन गाठले अशी आपबीती एपीआय राहुल फुला यांना कथन केल्यावर वरील प्रमाणे पिडीत १९ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिल्याने पती निलेश प्रतापसिंग परदेशी सह जेठाणी आशाबाई उदेसिंग परदेशी सासू देवकाबाई प्रतापसिंग परदेशी या सासरच्या सह अजय मधुकर परदेशी सर्व राहणार तांदळी ता अमळनेर व पतीच्या मित्र भैया उर्फ निलेश राजेंद्र पाटील राहणार गोवर्धन या पाच जणांविरुद्ध विरुद्ध संगनमताने सामूहिक रित्या जीवे मारण्याचा , शारीरिक व मानसिक छळ करणे आदी भादवी कलम ३०७ ,४९८ ( अ ),३२४,२९४,२०१,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आशा विविध १० कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे , गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू असतानाच एपीआय राहुल फुला व डीवायएसपी राकेश जाधव यांनी तांदळी गावी महिला पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरा पंचनामा करण्याचे काम करीत होते मात्र वृत्त लिहे पर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती अशी माहिती तपासी अधिकारी एपीआय राहुल फुला यांनी दिली , पुढील तपास एपीआय राहुल फुला व भास्कर चव्हाण हे करीत आहेत