पाचोरा, (प्रतिनिधी)- आस्था फाउंडेशनच्या वतीने गरजु महिला भगीनींचा भेट वस्तू देऊन सन्मान केला. यावेळी साडीचोळी,हळदीकुंकू, श्रीफळ, मिठाई देऊन ओटी भरून केला नवं दुर्गांचा सन्मान करण्यात आला.
रोजच्या दैनंदिन जीवनातल्या खऱ्या खुऱ्या पण,दुर्लक्षित असलेल्या नवदुर्गा. ज्या रोजच्या उदरनिर्वाहासाठी कोणापुढेही हात न पसरता, स्वाभिमानाने ,आपले, घर,कुटुंब चालवता व ताट मानेने जगणाऱ्या अशा नऊ दुर्गांचा सन्मान आस्था अनघादि फौंउडेशन च्या अध्यक्षा वैशाली निर्मला बापुराव चव्हाण यांनी केला.यातील नवदुर्गा आहैत. फुले विकुन देवघर ला शोभा आणणारी आहै.तर कोणी दिवे,भाजीपाला,जाडीबुटी, लहान भांडी, जिच्या हाताने आपल्या प्रत्येकीच्या घराची वीट आणि वीट लागते अशी दुर्गा,प्रत्येक घरातील हक्काची मावशी .जिच्या मुळे घर अपुर्ण राहाते.अगदी लक्ष्मी म्हणून वावरणारी आपली केरसुणी .ती विकणारी आजी,ते तुटलेले चप्पल शिवुनदेणारी ते, बुटाला चकाकी देणारी आजी,हेबघिल्यावर एक ऊर्जा निर्माण करणारी ही दुर्गा ह्या ही वयात काम करते म्हटल्यावर आपल्या ला ही एक नवि चेतना निर्माण करते.अशा या दुर्गा या सन्मानाने आनंदित झाल्या.