अमळनेर, प्रतिनिधी- वेब मीडिया असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सचीव गणेश पुजारी यांनी नुकतीच दुसरी यादी जाहीर केली.
वेब मीडिया असोसिएशनची मुंबई येथे बैठक घेतली व कार्यकारिणी घोषित केली.वेब मीडिया असोसिएशन ही रजिस्टर असोसिएशन असून वेब असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी वेब पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पत्रकारांचे संघटन करणार असून त्यांच्या अडीअडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातील पोर्टलला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शासन पातळीवर ते प्रयत्न करणार आहेत. यासाठी त्यांनी अगोदर वेब असोसिएशनची झूम मीटिंग द्वारे पत्रकारांशी संपर्क साधला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एक मोठे संघटन उभे राहणार आहे.अमळनेर तालुक्यातील खेडी(अमळगाव) येथील रहिवासी,मागील १९ वर्षांपासून पत्रकारिता सेवेत सक्रिय असलेले आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथील जेष्ठ उपक्रमशील शिक्षक,उत्तम वक्ता, लेखक,कवी,आदर्श सूत्रसंचालक, तंत्रस्नेही शिक्षक लोक पत्रिका न्यूज पोर्टलचेे मुख्यसंपादक किरण चव्हाण यांची जळगाव जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीबद्दल मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.