भडगाव- येथिल समस्त माळी पंच मंडळ बैठकीत कार्यकारणीची निवड करण्यात आली. माळी समाजची बैठक पंचमढी येथे घेण्यात आली. अध्यक्षस्थानी साहेबराव महाजन हे होते. बैठकीत अगामी श्री संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतिमा मिरवणूक काढणे, गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व महाप्रसाद,आदी कार्यक्रमाचे नियोजनाबाबत चर्चा होऊन माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सह कार्यकारणीची निवड करण्यात आली..
यावेळी अध्यक्षपदी प्रकाश सुकदेव महाजन, उपाध्यक्षपदी गोरख रघुनाथ माळी, उपाध्यक्ष विजय धाकलू महाजन सचिव प्रविण महाजन , खजिनदार दत्तात्रय श्रावण महाजन, कार्यकारणी सदस्य म्हणुन गोकुळ महाजन, संदिप बोरसे, जिवन महाजन, विनोद महाजन, अशोक महाजन, उज्ज्वल महाजन, उमेश महाजन यांची निवड करण्यात आली. यावेळी विनोद महाजन, भिकन महाजन, विलास महाजन , अनिल महाजन, गणेश महाजन, रावसाहेब महाजन, प्रदिप महाजन, सतीष महाजन, मनोज महाजन , संतोष महाजन, विशाल महाजन, दिनेश पाटील, कैलास महाजन, गोविंद महाजन, राहुल महाजन, सोनु महाजन, संतोष पाटील, योगेश महाजन, विजय महाजन, दत्तु महाजन आदी समाज बांधव उपस्थित होते.















