- स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांचे प्रतिपादन
पुणे, (प्रतिनिधी) – पुणे शिक्षण क्षेत्रामधील संकल्पना, अडथळे व नवोपकम समजुन घेण्यासाठी व शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी शाळा सिद्धि चे राज्य निर्धारक प्रमुख आसिफ शेख यांच्या संकल्पनेतून दि. 02 आक्टो 2020 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती प्रसंगी राज्यस्तरीय ऑनलाईनशिक्षण संवाद ( शैक्षणिक चर्चा ) आयोजन करण्यात आले होते.

शिक्षण संवादाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक राज्याचे शिक्षण सह संचालकदिनकरराव टेमकर उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन करताना शालेय जीवनापासून स्वच्छतेचे महत्त्व वाढीस लावण्यासाठी व शाळा विकासासाठी संवादक आसिफ शेख व सहकाऱ्यांनी चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे म्हटले.पुढे बोलताना
सहसंचालक, प्राथमिक शिक्षण पुणे डॉक्टर दिनकर टेमकर यांनी
*शालेय स्वच्छता व स्वच्छतेचे महत्व याविषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामध्ये खालिल महत्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश होता.
✍️ *गांधीजींचे स्वच्छता विषयक 10 संदेश
*(१) राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेचे महत्त्व अधिक आहे.
*(२) व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही.
*(३) शौचालय आपल्या बैठक कक्षा प्रमाणे स्वच्छ ठेवले पाहिजे.
*(४) साफसफाई ने भारताचे गाव आदर्श बनू शकतात.
*(५) नद्या स्वच्छ ठेवून आपण आपल्या सभ्यता जिवंत राखू शकतो.
*(६) आंतरिक स्वच्छता पहिली वस्तू आहे जी शिकवता येत नाही.
*(७) प्रत्येकाने आपला कचरा स्वतः स्वच्छ करायला हवा.
*(८)मी कोणालाही घाणेरड्या पायाने आपल्या मनात प्रवेश देणार नाही.
*(९) आपली चूक स्विकारणे, झाडू लावण्यासारखे आहे .ज्याने जागा स्वच्छ आणि चमकदार होते.
*(१०)स्वच्छता आपल्या आचरणात याप्रकारे सामील करा की, त्याची सवय होईल.
*कोरोना काळातील वैयक्तिक स्वच्छता
*विद्यार्थी आरोग्य व शालेय स्वच्छता
*शाळाबाह्य विद्यार्थी व उपक्रम
*स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय
अशाप्रकारे विषयावर सखोल राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चा करण्यात आली.
यासंवादामध्ये शिक्षण विभागातील राज्यातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी, केंद्रप्रमुख, उपक्रममशील शिक्षक, मुख्याध्यापक यांनी सहभाग घेतला. शाळासिध्दी निर्धारक यांनीदेखिल मोठ्या उत्स्फूर्तपणे याप्रसंगी सहभाग घेतला व पुढील नियोजन व वेगवेगळ्या नवीन उपक्रमाविषयी चर्चा केली रा ज्य ऑनलाइन चर्चासत्र उपक्रमात निमंत्रित सहभागी महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझ रकर यांनी या नाविन्यपूर्ण स्वच्छतेच्या संदर्भात उपयुक्त उपक्रमाच्या प्रसंगी प्रेरणादायी उपक्रम असल्याचेम्हटले. उद्घाटनानंतर येथून पुढील सत्रात राज्यातील जवळपास सर्वच अधिकारी तसेच एससी ईआरटी एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांना यात सहभागी करून त्यांचे मार्गदर्शन तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचे अनमोल मार्गदर्शन शिक्षकांना देण्यात येणार आहे असे आसिफ शेख यांनी स्पष्ट केले.संवादक शाळा सिद्धि चे राज्याचे तळमळीने कार्य करणारे समन्वयक आसिफ शेख साहेबांनी हा राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षण संवादाचा प्रेरणादायी उपक्रम सुरू केल्याने शिक्षण क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे . राज्यातील सर्वच शाळा सिद्धि निर्धारक आणि शिक्षक प्रेरणादायी कार्य करत असून राज्यातील शिक्षक अधिकारी पालक समन्वय वाखाणण्याजोगा असल्याचे यावेळी बोलताना शिक्षण विभागात समन्वय समितीचे राज्य महासचिव राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर (उपक्रमशील शिक्षक)यांनी ऑनलाइन मीटिंगमध्ये स्पष्ट केले व सदरील शिक्षण संवादाचा उपक्रम अनमोल असून राज्याच्या शैक्षणिक व राष्ट्रीय विकासासाठी उपयुक्त आहे यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना दिशा व लाभ मिळणार आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समिती अंतर्गत सहभागी असलेल्या सर्व शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष व पदाधिकारी राज्य समता शिक्षक संघ तसेच सर्व शिक्षक संघटना शासनाच्या व शिक्षण विभागाच्या सोबत एकजुटीने चांगल्या उपक्रमात पुढाकार घेतील असे किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या असल्याचे किशोर पाटील कुंझरकर यांनी सदरील ऑनलाईन राज्यस्तरीय उपक्रमाविषयी बोलताना
सांगितले. राज्यातील सर्व शाळा सिद्धि निर्धारक यांचा यावेळी सहभाग होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व राज्यातील शाळा सिद्धी निर्धारकांनी मोलाचे सहकार्य केले. उपक्रमाचे आयोजक आसिफ शेख यांनी एकत्रित सर्वांचेआभार व्यक्त केले. शिक्षण आयुक्त डॉक्टर विशाल सोळंकी,शिक्षण संचालक डॉक्टर दिनकर पाटील द गो जगताप आदींनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.















