पुणे, – हाथरस येथील बलात्काराच्या पाशवी घटनेवर शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले की दुर्दैवाने महिलांवरील अत्याचाराच्या गोष्टी वाढताय, महाराष्ट्रातही अशा गोष्टी झाल्या, मात्र आपण इथे तातडीने ऍक्शन घेतली. मात्र उत्तर प्रदेशमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्यात तेथील राज्य सरकारची भूमिका या सगळ्या प्रश्नांमध्ये बघ्याची आहे. आणि हे निंदनीय आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू झाला. त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं हे सगळं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता देशभरात उपस्थित होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील उत्तर प्रदेश सरकारवर प्रश्न उपस्थित करून सरकारच्या या भूमिकेला निंदनीय म्हटलं आहे.
















