रावेर, (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील निंबोल येथे प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे,जिल्हा प्रभारी आनंद जाधव व जिल्हा कार्यध्यक्ष मुबारक शहा,जिल्हा महासचिव मिलिंद निकम यांच्या उपस्थितीत रावेर तालुका प्रोटॉन संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी उमेश दांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, आर एम बी के एस या ट्रेड युनियन अंतर्गत येणाऱ्या “प्रोटॉन” या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील निंबोल येथे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱी वृंद यांच्या मोठया उपस्थितीत तालुका कार्यकारणी निवडीसाठी बैठक संपन्न झाली. यावेळी राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे यांच्या उपस्थितीत व जिल्हा प्रभारी अनंत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते तालुकाध्यक्ष पदी उमेश दांडगे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी संघटने विषयी माहिती दिली व उपस्थितांनी केलेल्या प्रश्नांना समाधान कारक उत्तर दिले व संघटन मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सभासद होण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे,जिल्हा प्रभारी आनंद जाधव व जिल्हा कार्यध्यक्ष मुबारक शहा, जिल्हा महासचिव मिलिंद निकम, धरणगावं तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, पारोळा तालुका अध्यक्ष सुनील मोरे, पूर्णवेळ प्रचारक नितीन गाढे, विपीन पाटील, विश्वनाथ पाटील, दिलिप पाटील, केंद्रप्रमुख ऐनपुर विलास कोळी, पुंडलिक पाटील, गोपाळ महाजन, हबीब तडवी, मुनाफ तडवी, सुरेश चिमनकर, महेंद्र वंजारी, युवराज सावळे, संगीता घोलाणे, महेंद्र लोंढे, मुकुंदा इंगळे, राहुल अवसरमल, अमित शिरसाठ, उदय अवसरमल, शेख इसाक, तरबेज खान,आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.















