भडगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शाखेच्या वतीने उत्तर प्रदेश येथील मनीषा वाल्मिकी या युवतीवर झालेल्या बलात्कारचा निषेध करण्यात आला तसेच आरोपींना कठोर शिक्षा करावी चे निवेदन नायब तहसीलदार देवकर यांना देण्यात आले.
उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावात मनीषा वाल्मिकी नावाच्या दलित परिवारातील मुलीवर उच्च जातीतील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार करून.तिची हाडे तोडली, जीभ कापली,व गळा दाबून जीवे मारण्याचे कृत्य केले आहे.आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करीत आहोत. तिने मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्व काही कथन केले.त्यानंतर पोलिसांनी त्वरीत आरोपींना अटक केली.दलित परिवारातील कुमारी मनीषा वाल्मिकी फक्त १९ वर्षे वयाची होती.ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना, तिच्या पाळतीवर असलेल्या उच्च जातीतील या गुंडांनी कायद्याची भीती न बाळगता हे दुष्कृत्य केलेले आहे.
आम्ही या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की,सदर गुन्हा योग्य त्या कायद्याच्या कलमाखाली फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून , आरोपींना त्वरीत कठोर शिक्षा करण्यात यावी.
निवेदनावर जिल्हा अध्यक्ष उत्तम मोरे, तालुका अध्यक्ष रवी आहिरे, युवा अध्यक्ष सुधीर आहिरे, गणेश वैद्य, सुरेंद्र मोरे, रमेश सोनवणे, चेतन भोई, संजय शेवाळे, दिलीप वाघ ( फौजी ), गणेश मोरे, रतन चव्हाण, भूषण वाघ, संजय मोरे, किशोर पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत