गौरवकुमार पाटील / अमळनेर – येथून जवळच असलेल्या झाडी येथील रहिवासी शोभाबाई रवींद्र पवार वय ४५ वर्षे या विवाहित महिलेने काल दिनांक ३० ते १ चे पहाटे दरम्यान गावचे शेजारीच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे घटना गुरुवारी सकाळी उघलकीस आली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की झाडी येथील शोभाबाई रवींद्र पवार ह्या काल रात्री कुटुंबातील सदस्य जेवणाला बोलावीत असतांना भूक लागली नाही असे सांगून झोपी गेले , त्यातील महिलेचा मुलगा दिपू रवींद्र पवार लघवी साठी उठल्यावर आई खाटेवर नाही म्हणून कुटुंबियांना सांगून जवळपास शोधाशोध केली मात्र रात्र जास्त झाल्याने पुन्हा दिनांक १ रोजी दिवस उजळल्यावर गावाजवळील विहिरीजवळ शोधाशोध सुरू केली असता काहीच तपास लागत नाहीत हे लक्षात आले तोच गावचे काही अंतरावर असलेल्या भाईदास सुखदेव पाटील यांचे शेतातील विहिरीजवळ चपला पळलेल्या दिसल्याने गावातील युवकांनी बिलाडी आणून विहिरीत टाकली असता त्यात साडी अडकून शोभाबाई रवींद्र पवार यांचा मृतदेह त्यात अडकून आल्याने पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती मारवड पोलिसांना देताच घटनास्थळी सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव ,हवालदार भास्कर चव्हाण , पोलीस नाईक फिरोज बागवान यांनी घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला व घटनास्थळी पंचनामा करून दुपारी दोन वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ जी एम पाटील यांनी शवविच्छेदन करून सायंकाळी झाडी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले , याबाबत मृत महिलेचा मुलगा दिपू रवींद्र पवार यांनी दिलेल्या खबरीवरून सदर महिला ही गेल्या काही दिवसांपासून मनोरुग्ण सारखी वागत असल्याने त्यांना मनोचिकित्सक कडून औषधोपचार सुरू होते मात्र काही दिवसांपासून गोळ्या संपल्याने त्याना अत्यवस्थ वाटत असल्याचे खबरीत नमूद करण्यात आले आहे यावरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ,त्यांचे पश्चात पती ,दोन व अविवाहित मुले ,दोन विवाहित मुली असा परिवार आहे ,पुढील तपास सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव व हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत.