युवानेते मंगेश चव्हाण व मित्र परिवाराचा अभिनव उपक्रम
चाळीसगाव ;- साने गुरुजी प्राथमिक शाळेत आजूबाजूचे सर्व समाज घटकातील विद्यार्थी शिक्षण घेतात, परंतु पालकांची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेमच. या विद्यार्थ्यापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचे काम युवा नेते मंगेश चव्हाण मित्र परिवाराने केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिका शिक्षण प्रशासन अधिकारी डि.व्ही. माळी साहेब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून युवानेते मंगेश चव्हाण, नगरसेवक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख नानाभाऊ कुमावत, नगरसेविका विजया ताई पवार, नगरसेवक चंद्रकांतदादा तायडे, नगरसेवक भास्कर आबा पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, खुशाल पाटील, बी.टी.नाडर, आण्णा गवळी, सविता कुमावत, अनिता शर्मा, ताराबाई चव्हाण सह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, वही व पेन गणवेश दिले. विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. त्यांच्या डोळ्यात समाधानाची भावना जाणवली. त्यानंतर युवानेते मंगेश चव्हाण, नगरसेवक नानाभाऊ कुमावत, विजया पवार, चंद्रकांत तायडे व मान्यवरच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शारदा महाले मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. सूत्रसंचलन अविनाश घुगे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन महेंद्र कुमावत सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक विकास बोरसे, संगीता महाले, मनिष पाटील, किशोर सोनवणे, आरती राणे तसेच डेराबर्डी येथील भाजपा युवा मोर्चा चे उप-शहराध्यक्ष राहुल पाटील, गजानन चौधरी, गणेश पाटील, सनी पाटील, उमेश चव्हाण, सौरभ पाटील, संकेत पाटील, शकील शेख, बाबा शेख, राहुल जाधव, स्वप्नील पाटील, प्रवीण जाधव, किरण निकम, राजू जाधव, मयुर साळुंखे, मयुर पाटील, सागर राजपूत, वाल्मिक पाटील, राहुल गवळी, सिद्धार्थ पाटील परिसरातील नागरिक उपस्थित होते.