मुक्ताईनगर, (प्रतिनिधी)- जनशक्ती पक्षाच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी अनिल कान्हे यांची निवड पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी नुकतीच केली. यावेळी बोदवड तालुका प्रमुख राहुल अग्रवाल, ईश्वर आनंदा कोळी, सचिन सीताराम लोखंडे, निलेश बाळू कापसे यांच्यासह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.