- तंबाखू मुक्तीसाठी प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांची कार्यशाळा
- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्य रुग्णालय व ब्रह्माकुमारीज् मेडिकल प्रभाग यांचा संयुक्त उपक्रम
जळगाव – राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रूग्णालयातील जिल्हा तंबाखु नियंत्रण कार्यकम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातर्गत कांताई हॉल येथे जिल्हा शल्य रुग्णालय आणि ब्रह्माकुमारीज् मेडिकल प्रभाग यांच्या मार्फत प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांची संयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूसेवनाचे प्रमाण वाढत आहे. त्याअनुषंगाने तंबाखूमुक्ती बाबतचे मौखिक आरोग्य शिबिरे, शाळा, महाविद्यालये व सभोवतालचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी, तंबाखूच्या दुष्परिणामाबाबतचे जिल्हा रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्ष यांनी मेडिकल विंग, राजयोग एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कांताई हॉल येथे प्राथमिक व माध्यममिक मुख्याध्यापकांसाठी प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या दोन्ही कार्यशाळेचे उद्घाटन श्री. गणेश शिवदे, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक, ब्रह्माकुमारी दिदी, वर्षा दिदी, डॉ. सचिन परब, राजेंद्र सपकाळे, शिक्षण विस्तार अधिकारी, डॉ. नितीन भारती, जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय तंबाकु नियंत्रण कार्यक्रम, श्री. बी. डी. धाडी, शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. किशोर वायकोळ, शिक्षण विस्तार अधिकारी, जे.के. पाटील, अघ्यक्ष, जिल्हा मुख्याध्यापक संघ, कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी, आर. एल. माळी, शिक्षण विस्तार अधिकारी, गणेश शिवदे, शिक्षण विस्तार अधिकारी आदिंच्या शुभहंस्ते करण्यात आले.
सेलिब्रेटींनी समाजभान ठेवावे :
माध्यममध्ये समाजातील नामांकित व्यक्ति, चित्रपट अभिनेते आदिं व्यसनांचा खुले आम प्रचार जाहिरातींच्या माध्यमातून करतात, शालेय विद्यार्थी, युवकांच्या आकर्षणाचे केंद्र हे सेलिब्रेटी असल्याने व्यसनांच्या जाळ्यात अलगद अडकतात. ही बाब चिंताग्रस्त असून सेलिब्रेटींनी समाजभान ठेवून आपले वर्तन करावे असेही त्यांनी सांगितले. प्रतीवर्षी जगात 60 लाख व्यक्ति तंबाखूसेवनाने दगावतात सन 2030 पर्यंत हा आकडा 80 लाख इतका जाण्याची भिती आहे.
तंबाखू सर्व व्यसनांची जननी :
व्यसनांची सुरूवात करण्यासाठी केवळ गंमत म्हणून तंबाखु, गुटखा सेवन करणारे पुढे नियमित सेवन करतात आणि त्यायोगे अन्य व्यसनांचेही शिकार होतात त्यामुळे मूळ स्त्रोत तंबाखु असल्याने त्यापासून मुक्ती करण्यासाठी सर्वांनी पुढे सरसावले पाहिजे असे आवाहन ही त्यांनी या प्रसंगी केले. याप्रसंगी राजमहंमद शिकलकर, कँसर पासून बचाव अनुभव कथन केला. कार्यक्रमास डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव, श्री. विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी, परेश बडगुजर, मेडिकल प्रभाग सदस्य, डॉ. विशाखा गर्गे यांचे सहकार्य लाभले