Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील वीजग्राहकांसाठी तक्रार निवारण व शंका निरसन शिबीर

najarkaid by najarkaid
June 27, 2020
in जळगाव
0
घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव परिमंडळाअंतर्गत जळगाव ,धुळे व नंदुरबार मंडळातील घरगुती वीज ग्राहकांसाठी  टाळेबंदीनंतरच्या वीजदेयकांच्या अनुषंगाने दि.29 जुन ते 10 जुलै 2020 या कालावधी दरम्यान तक्रार निवारण व शंका निरसन शिबीरे आयोजित करण्यात आलेली आहेत. तरी कृपया ग्राहकांनी नियोजित दिवशी संबंधीत उपविभाग वा कक्ष कार्यालयाचे ठिकाणी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता मा.श्री. दिपक कुमठेकर यांनी केले आहे.

ग्राहकांना ग्राहक क्रमांकाच्या आधारे आपल्या देयकांची  गणना व पडताळणी  करण्याची सुविधा      https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ लिंकवर उपलब्ध आहे. तरीही आपले समाधान झाले नसल्यास ग्राहकांनी तक्रार निवारण व शंका निरसन शिबीराचा लाभ घ्यावा. शिबीरात सहभागी होणाऱ्या वीजग्राहकांनी मुखपट्टी (मास्क) परिधान करणे , सॅनिटायझरचा वापर करणे , सामाजिक अंतर राखणे इ. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन करावे.

शिबीराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे

जळगाव मंडळ  –जळगाव मंडळातील उपविभाग व कक्ष कार्यालयात दि.29 जुन ते 10 जुलै या कालावधीदरम्यान सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत शिबीराचे आयोजन केले आहे.  चाळीसगाव विभागातील चाळीसगाव ग्रामीण उपविभाग 1 मधील गणेशपुर, टाकळी व मेहुणबारे (दि.29 जुन )  , तळेगाव कक्ष 1, पातोंडा व बहाळ (दि.30 जुन )  तळेगाव कक्ष 2, खेडगाव,चाळीसगाव शहर उपविभाग क्रमांक 2 व 3 (दि.02 जुलै), टाकळी, वाघळी, खडकी व दहिवद (दि.03 जुलै) ,सांगवी (दि.04 जुलै ), जळगाव विभागातील  जळगाव शहर क्रमांक 1 व 2, जळगाव ग्रामीण, नशिराबाद उपविभागात आदर्शनगर व भादली (दि.29 जुन ), महाबळ , प्रभात कॉलनी , पिंप्राळा कक्ष 1 व  विदगाव (दि.30 जुन) पॉवर हाऊस ,सिंधी कॉलनी व म्हसावद (दि.01 जुलै ), एमआयडीसी क्रमांक 2 , पिंप्राळा कक्ष 2,  शिरसोली,  चिंचोली व भादली (नशिराबाद) (दि.02 जुलै ), एमआयडीसी क्रमांक 1 , जळगाव शहर उपविभाग 2 व वावडदा (दि.03 जुलै )  जळगाव शहर उपविभाग 1 व कानळदा (दि.04 जुलै )  असोदा (दि.06 जुलै ) , नशिराबाद ग्रामीण (दि.07 ते 09 जुलै )  नशिराबाद शहर (दि.10 जुलै ), पाचोरा विभागातील नगरदेवळा, पाचोरा क्रमांक 1 , पाचोरा क्रमांक 2 , भडगाव व पारोळा या उपविभागातील कजगाव व पारोळा शहर (दि.29 जुन ), नगरदेवळा व पारोळा ग्रामीण 1 (दि.30 जुन ), भडगाव शहर 1 व 2 , पिंपळगाव हरेश्वर, नेरी, पारोळा ग्रामीण 2 व खेडगाव (दि.01 जुलै ), लासगाव, लोहटार, आमडदे, गोंदगाव, मंगरूळ व पाचोरा शहर क्रमांक 3, (दि.02 जुलै ), लोहारा, भडगाव ग्रामीण 1 व 2, बहादरपुर व शिंदाड (दि.03 जुलै ) , कोळगाव, नांद्रा, मोहदी व  पाचोरा ग्रामीण (दि.04 जुलै ) या कक्षाचे  ठिकाणी , भुसावळ विभागातील भुसावळ शहर उपविभाग (दि.30 जुन), पहूर उपविभाग (दि.02 जुलै)  व जामनेर उपविभाग (दि.03 जुलै) उपविभाग कार्यालयाचे ठिकाणी, भुसावळ ग्रामीण उपविभागातील साकेगाव (दि.30 जुन) व फेकरी (दि.02 जुलै) कक्षाचे ठिकाणी, मुक्ताईनगर विभागातील बोदवड, मुक्ताईनगर  व वरणगाव उपविभागातील  कक्षाचे ठिकाणी बोदवड शहर  व मुक्ताईनगर शहर (दि.29 जुन ) बोदवड ग्रामीण 1, करकी व चांगदेव (दि.30 जुन ), ऐनगाव, वरणगाव शहर व अंतुर्ली (दि.01 जुलै ) , बोदवड ग्रामीण 2 , वरणगाव ग्रामीण 1  व कुऱ्हा (दि.02 जुलै ), शेलवड, वरणगाव ग्रामीण 2, वडोदा व कोठली (दि.03 जुलै), कोलादी , मुक्ताईनगर ग्रामीण व उचंदा (दि.04 जुलै ),  तळवाडे (दि.06 जुलै ), आचेगाव (दि.07 जुलै ), सावदा विभागातील यावल, फैजपुर, सावदा व रावेर उपविभागात  यावल शहर (दि.30 जुन ), फैजपुर शहर (दि.01 जुलै), सावदा शहर (दि.02 जुलै ), रावेर शहर (दि.03 जुलै) कक्ष कार्यालयाचे ठिकाणी, रोजी  शिबीराचे आयोजन केले आहे.

नंदुरबार मंडळ – नंदुरबार मंडळातील शहादा विभागातील शहादा शहर उपविभाग  (दि.28 जुन ) सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत, शहादा उपवभिाग क्रमांक 1 व 2 , तळोदा, अक्कलकुवा व धडगाव उपविभाग कार्यालयात ( दि.29 जुन ते 3 जुलै ) व नंदुरबार विभागातील नंदुरबार शहर उपविभाग, नंदुरबार ग्रामीण उपविभाग क्रमांक 1 (दि.29 जुन), स. 10.00 ते दु. 4.00 वाजेपर्यंत शिबीराचे आयोजन केले आहे .

धुळे मंडळ – धुळे मंडळातील दोंडाईचा विभागातील शिरपुर उपविभाग क्रमांक 1 व 2, धुळे शहर विभागातील बांधकाम, संचालन व सुव्यवस्थापन (सीसी ॲन्ड ओएम) उपविभागातील नगाव कक्ष (दि.30 जुन), फागणे कक्ष (दि.01 जुलै),  धुळे शहर उपविभाग क्रमांक 1 मधील पॉवर हाऊस,  धुळे शहर उपविभाग क्रमांक 2 मधील पंचवटी व तुळशीरामनगर कक्षाचे ठिकाणी, नरडाणा उपविभाग व दोंडाईचा उपविभाग (दि.2 जुलै), धुळे शहर उपविभाग क्रमांक 2 व शिंदखेडा  उपविभाग (दि.03 जुलै) येथे सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत शिबीराचे आयोजन केले आहे.  

परिमंडळस्तरावर मुख्य अभियंता यांनी जळगाव ,धुळे व नंदुरबार मंडळातील औद्योगिक ग्राहक व ग्राहक संघटना प्रनिनिधीसमवेत वेबिनारव्दारे संवाद साधून ग्राहकांच्या टाळेबंदीच्या कालावधीतील वीजदेयकांच्या शंकाचे निरसन करून व वीजपुरवठ्यासंदर्भातील अडचणींची दखल घेतली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या दि. 23 मार्च ते 22 मे 2020 या कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या वीज देयक भरणा केंद्रे, वीज मीटर वाचन व वीज देयकांच्या छापिल प्रतीचे वाटप ही प्रक्रिया बंद ठेवली होती. टाळेबंदीच्या कालावधीत ग्राहकांना स्वत:चे वीज मीटर वाचन करून मोबाईल ॲप वा पोर्टलव्दारे मीटर वाचन नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्या ग्राहकांनी वीज मीटर वाचन नोंदविले, अशा ग्राहकांना मीटर वाचनानुसार वीजदेयके दिली गेली. उर्वरीत ग्राहकांना सरासरी वीजवापराची देयके देण्यात आली. ग्राहकांना वीजदेयके मोबाईल ॲप वा पोर्टलवर पाहण्याची व ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याबाबत वृत्तपत्रे व सामाजिक माध्यमाव्दारे (सोशल मिडिया) जनजागृती करण्यात आली. उपरोक्तपणे नोंदणीकृत मोबाईलधारकांना माहितीचे लघुसंदेश (एसएमएस) ही पाठविण्यात आले. दि. 22 मे 2020 नंतर (प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता ) टप्याटप्याने उपरोक्त प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मीटर वाचनानंतर ग्राहकांना एप्रिल, मे व जुन या तीन महिन्याचे कालावधीचे एकत्रित देयक वीज युनिटच्या टप्पेनिहाय दर आकारणीच्या लाभासह (स्लॅब बेनिफिट) दिले आहे. ज्या ग्राहकांनी वीजदेयकांचा भरणा केला आहे. त्या भरणा रक्कमेची वजावट करून देयके दिली आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगावच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रच्या स्थलांतरावर एकनाथराव खडसे म्हणाले..

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १११ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १११ कोरोना बाधित रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us